Ad will apear here
Next
पुणेरी पलटणचे अंध कबड्डी खेळाडूंना मार्गदर्शन
पुणे : अंध कबड्डी खेळाडूंचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रो कबड्डी लीग मधील एक प्रमुख संघ पुणेरी पलटणने पुढाकार घेतला आहे. यानिमित्त अखिल भारतीय अंध स्त्री-हित असोसिएशन (एआयएएसएचए) या सामाजिक संस्थेच्या अंध खेळाडूंसाठी नुकतेच फिनिक्स मॉलमध्ये एका कबड्डीच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. १८ खेळाडूंनी हा कबड्डीचा सामना खेळला. पुणेरी पलटण संघामधील प्रमुख खेळाडू धर्मराज चेलारथन आणि गिरीश एर्नाक आणि आयएएसएचएच्या संस्थापक व सचिव नेहा पावसकर यावेळी उपस्थित होते. 

या वेळी धर्मराज चेलारथन म्हणाला, ‘मी गेली १५ वर्षांपासून कबड्डी खेळत आहे पण अशा प्रकारचा कबड्डीचा सामना मी आयुष्यात पहिल्यांदाच बघितला. कबड्डी हा खूप अवघड असा खेळ आहे आणि त्यासाठी खूप कौशल्ये आत्मसात करावी लागतात पण दिसत नसताना देखील या खेळाडूंनी ज्याप्रकारचे कौशल्य दाखवले आणि पायांचा वापर केला ते बघून मी खूप प्रभावित झालो. या सर्व खेळाडूंनी दाखवलेली जिद्द खूप कौतुकास्पद आहे आणि माझ्या या सर्व खेळाडूंच्या भविष्यातील वाटचालीस माझ्या शुभेच्छा.’

 पुणेरी पलटणचे सीईओ कैलाश कांडपाल म्हणाले, ‘या खेळाडूंना दिसत नसले तरी या खेळाडूंना दृष्टीकोन आहे. या खेळाडूंनी दाखवलेले कौशल्य अतिशय वाखाणण्याजोगे आहे. एआयएएसएचए सोबत केलेली ही भागीदारी म्हणजे समाजातील सर्व घटकांमधील लोकांपर्यंत कबड्डीचा प्रसार करण्याच्या दृष्टीने उचललेले एक पाउल आहे.’
 
नेहा पावसकर म्हणाल्या, ‘पुणेरी पलटणची मी खूप आभारी आहे. त्यांनी या प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ दिले. एआयएएसएचएचे सर्व खेळाडू कबड्डी या खेळाबद्दल खूप गंभीर आहेत आणि खेळामध्ये सुधारणा करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या या पाठींब्यामुळे आमचे खेळाडू चांगलेच प्रोत्साहित झाले आहेत’.
 
नेहा पावसकर आणि नलीन पावसकर यांनी एआयएएसएचएच्या सर्व खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. अंध लोकांच्या सेवेसाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी एआयएएसएचएची २००३ ला स्थापना झाली. या संस्थेमार्फत अंध खेळाडूंसाठी विविध खेळांचे सामने भरवले जातात. पुणेरी पलटण १३ ते २० ऑक्टोबर दरम्यान बालेवाडीच्या छत्रपती शिवाजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सामने खेळणार आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZMYBG
Similar Posts
‘पुणेरी पलटण’ने महिलांना दिले स्वसंरक्षणाचे धडे पुणे : शक्ती आणि बुद्धी कौशल्याचा कस लागणाऱ्या कबड्डी खेळातील चालींचा उपयोग महिलांना स्वसंरक्षणासाठीही करता येऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक ‘पुणेरी पलटण’ने दाखवले. कबड्डीमधील चाली महिलांना स्वसंरक्षणासाठी उपयुक्त ठरतात याचे धडे देणारी कार्यशाळा शनिवारी, २ सप्टेंबर रोजी ‘मल्टीफिट’च्या सेनापती बापट रस्त्यावरील शाखेत घेण्यात आली
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ
‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर पुणे : सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील हरिश्चंद्रगडचा कोकण कडा, नागफणी, नानाचा अंगठा, मोरोशीचा भैरावगड, माहुलीचा बाण, नवरा-नवरी अशा अनेक सुळक्यांवर यशस्वी चढाया करणाऱ्या तसेच नाशिक त्रिंबकेश्वर पासून ते आंबोली पर्यंतच्या साह्यवाटा आणि गडकिल्ल्यांच्या यशस्वी मोहीमा राबवून तरुण पिढीला  गिर्यारोहण क्षेत्रामध्ये

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language